ईदला प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटाने घवघवीत यश संपादन केले. ‘किक’च्या यशाने सध्या अतिशय खुष असलेल्या या बॉलिवूडच्या सुपरस्टारचा आनंद द्विगुणीत करणारी आणखी एक घटना घडली आहे. टि्वटर आणि फेसबुक या सोशलमीडिया वेबसाईटवर कार्यरत असलेल्या सलमान खानच्या फेसबुकवरील चाहत्यांचा आकडा १९,०५५,८६७ इतका झाला असून, त्यात सतत वाढ होत आहे. जसा सलमानने एक कोटी ९० लाखांचा पल्ला पार केला, तसा #19MillionSalmaniacsOnFB हा हॅशटॅग टि्वटरवर ट्रेन्ड होण्यास सुरुवात झाली. फेसबुकवरील सलमानच्या या कामगिरीने सुपरस्टार शाहरूख खान आणि मेगास्टार अमिताभ बच्चनला मागे टाकले. फेसबुकवर शाहरूखचे १,०४,२३,४४६ फॉलोअर्स आहेत, तर बीग बींचे १,४९,६१,३२१ फॉलोअर्स आहेत.

 

Story img Loader