बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानला बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखले जाते. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी तो हँडसम हक म्हणूनच ओळखला जातो. सलमानचे जगभरात लाखो चाहते आहेत आणि त्यात मुलींची संख्या ही जास्त आहे. सलमान खान हा प्रसिद्ध लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याला सिनेसृष्टीत सहज काम मिळाले असेल असं अनेकदा बोललं जातं. मात्र नुकतंच एका मुलाखतीत सलमानने यावर भाष्य केले आहे.

“माझा पहिला चित्रपट १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘बीवी हो तो ऐसी’ असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटात रेखा आणि फारुख शेख हे मुख्य भूमिकेत होते. तर मी चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर वर्षभराने म्हणजे १९८९ मध्ये ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यामुळे तो एका रात्रीत स्टार बनला. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्री आणि सलमान या दोघांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Bengaluru techie's wife files dowry harassment complaint, claims she was treated like a Animal.
Atul Subhash : “मला जनावरासारखे वागवले…”, काय आहेत अतुल सुभाष यांच्यावर पत्नी निकिताचे आरोप?
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
expert career advice tips in marathi
करिअर मंत्र

दाक्षिणात्य चित्रपटांना कडी टक्कर, ‘हर हर महादेव’ चित्रपट मराठीसह ‘या’ चार भाषेत होणार प्रदर्शित

पण ‘मैने प्यार किया’ या चित्रपटानंतर अनेक महिने सलमान खानला रिकामी बसावे लागले होते. नुकतंच एका कार्यक्रमात त्याने याबाबतचा खुलासा केला आहे. “या चित्रपटानंतर अनेक महिने मी बेरोजगार होतो. ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माझे दिवस फारसे चांगले नव्हते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भाग्यश्रीने चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबत यानंतर तिने लग्न करणार असल्याचेही जाहीर केले होते. यामुळे तिला या चित्रपटाचे संपूर्ण श्रेय मिळाले आणि पुढील ६ महिने माझ्याकडे कोणतेही काम नव्हते.”, असे त्याने म्हटले.

“यानंतर देवाने माझ्या आयुष्यात रमेश तौरानी यांना पाठवले. त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना २ हजार रुपये दिले आणि निर्माते जीपी सिप्पी यांना सांगितलं होतं की एका मासिकाला सलमानला चित्रपट मिळाला असल्याची खोटी बातमी द्यायला सांग, जीपी यांनी वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे केले. पण त्या बातमीनंतर रमेश तौरानी हे स्वतः सिप्पी साहेबांच्या ऑफिसमध्ये आले आणि एका चित्रपटातील गाण्यासाठी मला ५ लाख रुपये दिले आणि त्याच ५ लाख रुपयांमुळेच मला ‘पत्थर के फूल’ हा चित्रपट मिळाला.” असे तो म्हणाला.

Story img Loader