सलमानला नुकताच अमेरिकेचा पर्यटक व्हिसा मिळूनही साजिद नादियदवाल्याच्या ‘किक’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरळीत चालत नसल्याचे चित्र आहे. चित्रपटातील इतर कलाकारांनी ग्लास्गो येथे पूर्वीच चित्रिकरण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सलमानचा व्हिसा नाकारल्यामुळे तो तेथे उशिरा पोहोचणार होता. त्यावर सलमानने पुन्हा एकदा व्हिसासाठी अर्ज केला. पण, तो आता नव्या समस्येला सामोरा जात आहे.
सलमानचे वडिल सलीम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानचा व्हिसा अर्ज मान्य करण्यात आला आहे. पण, त्याला अद्याप चित्रिकरणासाठी काम करण्याचा परवाना मिळालेला नाही. ‘किक’ची टीम ग्लास्गो येथे पोहचून तीन आठवडे उलटले तरी सलमान तेथे पोहचू न शकल्यामुळे परदेशातील चित्रिकरण थांबवण्यात आले आहे. आता चित्रपटाचा काही भाग भारतात चित्रीत करण्यात येणार आहे.
सलमान, जॅकलीन आणि रणदीप हुड्डाची प्रमुख भूमिका असलेला ‘किक’ पुढील वर्षी ईददिवशी प्रदर्शित होणार आहे.
‘किक’च्या चित्रिकरणात अडथळा!
सलमानला नुकताच अमेरिकेचा पर्यटक व्हिसा मिळूनही साजिद नादियदवाल्याच्या 'किक' चित्रपटाचे चित्रिकरण सुरळीत चालत नसल्याचे चित्र आहे.
First published on: 16-08-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan gets tourist visa for uk cant shoot for kick