बॉलिवूडचा भाई जान सलमान खानचा आज ५६वा वाढदिवस आहे. तो त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पनवेलच्या त्याच्या फार्महाऊसवर गेला होता. पण वाढदिवसाआधीच तिथे मोठा गोंधळ झाला होता. आता सलमानला सगळ्यात पहिलं गिफ्ट कोणी दिलं याचा खुलासा त्याने केला आहे.

सलमान खान हा मीडियासमोर आला त्यावेळी त्याने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. त्यासोबत त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि तपकिरी रंगाची पँट घातली होती. यावेळी सलमान म्हणाला की, त्याला सगळ्यात पहिलं गिफ्ट हे त्या सापाने दिलं आहे. “माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता. मी काठीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याचवेळी तो साप माझ्या हाताजवळ आला. मी त्याला सोडण्यासाठी पकडले असता त्याने मला दंश केला. त्यानंतर तिथे गोंधळ झाला आणि त्या सापाने पुन्हा एकदा मला दंश केला असा त्यानं मला तीनवेळा दंश केला. तर सापाने केलेले हे कृत्य पाहता त्यानेच वाढदिवसाचं पहिलं गिफ्ट दिलं” असं सलमान म्हणाला.

आणखी वाचा : प्रियांकाला ‘या’ हॉलिवूड अभिनेत्यासोबत करायचेय लग्न

आणखी वाचा : Video : सर्पदंशानंतर सलमानने भाची आयतसोबत केक कापत केला वाढदिवस साजरा

दरम्यान, सलमान खानच्या फार्महाऊसबाहेर अनेक फोटोग्राफर्सची गर्दी जमली होती. सलमानला गेटच्या बाहेर येताना पाहून एक फोटोग्राफर म्हणाला- ‘भाई, सुंदर स्माईल.’ सलमानाने त्याच्याकडे बघून हसत, ‘साप चावल्यानंतर असं हसणं खूप अवघड असतं,’ अशी प्रतिक्रिया दिली.