आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता कमाल रशिद खानला बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानसोबत पंगा घेणं चांगलंच महागात पडलंय. अभिनेता सलमान खानने केआरकेच्या विरोधात मुंबई कोर्टात मानहानीचा दावा ठोकलाय. हे प्रकरण सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यू संदर्भात आहे. सोमवारी सलमान खानच्या लीगल टीमतर्फे अभिनेता कमाल आर खानला यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे.
बॉलिवूडमधील फिल्म्स आणि गाण्याचं रिव्ह्यू करत अभिनेता केआरके नेहमीच कलाकारांची खिल्ली उडवत असतो. १३ मे रोजी ईद निमित्ताने अभिनेता सलमान खानची फिल्म ‘राधे’ रिलीज झाल्यानंतर केआरकेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्याने ‘राधे’ फिल्मचा निगेटिव्ह रिव्ह्यू केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं, “फिल्म ‘राधे’मध्ये काय विशेष आहे माहित नाही…’राधे’ फिल्म मी दुबईमध्ये पाहिली…या फिल्मच्या इंटरवलनंतर थिएटरमध्ये जाण्याची इच्छाच झाली नाही.”
केआरकेनं ‘राधे’ फिल्मबाबत शेअर केलेला हा व्हिडीओ सलमान खानच्या टीमला आवडला नाही. म्हणूनच सलमान खानच्या टीमकडून केआरकेला मानहानी संदर्भात नोटीस पाठवली आहे. त्यानंतर केआरकेने याच नोटीसच्या कॉपीचा एक फोटो शेअर करत ट्विट केलंय. सोबतच त्याने लिहिलं, “प्रिय सलमान खान, हा मानहानीचा दावा तुम्ही हताश आणि निराश झाल्याचा पुरावा आहे…मी माझ्या फॉलोअर्ससाठी रिव्ह्यू देऊन माझं काम करतो…मला फिल्मचा रिव्ह्यू करण्यापासून रोखण्यापेक्षा तुम्हाला उत्तम फिल्म बनवण्याची गरज आहे. मी सत्यासाठी लढत राहील. मानहानीच्या केससाठी धन्यवाद.”
Dear #Salmankhan Ye defamation case Aapki Hataasha Aur Niraasha Ka Saboot Hai. I am giving review for my followers and doing my job. You should make better films instead of stopping me from reviewing your films. Main Sacchi Ke Liye Ladta Rahunga! Thank you for the case. pic.twitter.com/iwYis64rLd
— KRK (@kamaalrkhan) May 25, 2021
सलमानच्या फिल्मचा कधीच रिव्ह्यू करणार नाही
केआरकेनं आणखी एक ट्विट शेअर करत आपलं म्हणणं मांडलं. यात त्याने लिहिलं, “मला जर एखाद्या प्रोड्यूसर किंवा अभिनेत्याने त्याच्या फिल्मचा रिव्ह्यू करायचा नाही, असं सांगितलं तर यापुढे मी त्यांच्या कोणत्याच फिल्मचा रिव्ह्यू नाही करणार.. सलमान खानने माझ्यावर मानहानीचा दावा केलाय, याचा अर्थ मी केलेल्या रिव्ह्यूवर ते नाराज आहेत…म्हणूनच यापुढे मी त्यांच्या कोणत्याच फिल्मचा रिव्ह्यू करणार नाही…माझा शेवटचा व्हिडीओ आज रिलीज करतोय.”
I said so many times that I never review film of any producer, actor if he asks me to not review. Salman khan filed defamation case on me for review of #Radhe means he is getting too much affected by my review. Hence I won’t review his films anymore. My last video releasing today
— KRK (@kamaalrkhan) May 26, 2021
आता सलमान खानने केआरकेवर मानहानीचा दावा ठोकल्यानंतर मुंबई कोर्ट यावर काय निकाल देतंय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.