बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी टायगर ३ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमानने वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी अद्यापही तो हँडसम हक म्हणूनच ओळखला जातो. सलमानचे जगभरात लाखो चाहते आहेत आणि त्यात मुलींची संख्या ही जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांचे बरेच फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या चर्चांवर सलमान खानने एक व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खान हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. काही दिवसांपूर्वी सलमानने त्याच्या आगामी टायगर ३ या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. त्यानंतर आता नुकतंच सलमानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे सलमानने लग्न झाल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमानने शेअर केलेल्या हा व्हिडीओ केवळ ५ सेकंदाचा आहे. या व्हिडीओत त्याच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील ‘प्रेम’ त्याला प्रश्न विचारताना दिसत आहे. यात तो सलमानला फक्त ‘लग्न…?’ असे विचारतो. त्यावर सलमान खान म्हणतो…’झाले’…! सलमानचे हे उत्तर ऐकून प्रेम चकित होतो आणि विचारतो ‘खरंच झाले’.

हा व्हिडीओ शेअर करत त्याला सलमानने हटके कॅप्शन दिले आहे. “लग्न झाले की नाही…हे जाणून घेण्यासाठी परवा नक्की पाहा”, असे त्याने म्हटले आहे. त्यासोबतच सलमानने #ad असे म्हटले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ एका जाहिरातीचा असल्याचे संकेत त्याने याद्वारे दिले आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

“तुम्ही इतके…”, सलमान खानसोबत लग्न केल्याच्या ‘त्या’ फोटोवर सोनाक्षी सिन्हाने दिले स्पष्टीकरण

दरम्यान सलमान आणि सोनाक्षीचा लग्न झाल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नुकतंच सोनाक्षी सिन्हाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तुम्ही इतके मूर्ख आहात का की तुम्हाला खरा आणि एडिट केलेला फोटो यातील फरक समजू नये, असे सोनाक्षी म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan has finally answered a question on marriage saying ho gai video viral nrp