सलमान खानची ‘लव्ह लाइफ’ नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. कतरिनासोबतच्या ब्रेकअपनंतर दबंग सलमान रोमानियाची नवी प्रेयसी लुलिया वेंतुरसोबत असल्याची चर्चा होती. मात्र, हे दोघेही वेगळे झाल्याचे वृत्त मिड-डेच्या सूत्रांनी दिले आहे. नुकतेच ‘किक’ चित्रपटाच्या हैदराबाद येथील चित्रिकरणावेळी हे दोघे एकत्र असलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. मात्र, त्यानंतर दोघेही कुठेच एकत्र दिसले नसून लुलिया रोमानियाला परत गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या दोघांचा ब्रेकअप झाल्याची शक्यता आहे.
सूत्रांनुसार, रोमानियन अभिनेत्री आणि टीव्ही सूत्रसंचालक लुलियाचे संगीतकार मारिअस मोगा याच्याशी लग्न झालेले आहे. पण, लुलियाने ही बातमी नाकारली आहे.
सलमानचा पुन्हा ब्रेकअप?
सलमान खानची 'लव्ह लाइफ' नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे.
First published on: 16-08-2013 at 05:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan is single again breaks up with girlfriend iulia vantur