सलमानच्या चाहत्या असलेल्या मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रेमबंधनात अडकण्याची इच्छा असल्याचे खुद्द सलमानने व्यक्त केले आहे.
बॉलीवूडचा दबंग स्टार सलमानने करण जोहरच्या कॉफी विथ करण या टॉक शोमध्ये आपण अजूनही सिंगल असल्याचे सांगितले. मात्र, आपल्याला प्रेमात पडायला आवडेल, असेही तो म्हणाला. गेली तीन वर्षे या शोला टाळत असलेल्या सलमानने, शो दरम्यान प्रेम आणि लग्नाबद्दलच्या त्याच्या भावना व्यक्त केला. इतकेच नाही तर खोडकर सलमान सेटवर एकटाच झोपलासुद्धा.
सलमानची प्रेमप्रेकरण ही बॉलीवूडमधील बहुचर्चित विषय आहेत. माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी, कतरिना कैफ अशी त्याच्या प्रेमाच्या यादीतील नावे आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी रोमानियन सुंदरी लुलिया व्हेंतुरचे नावही समाविष्ट झाल्याची चर्चा होती. पण, सध्या तरी या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे दिसत नाही.
करण जोहरने पहिल्यांदाच त्याच्या खास मित्राला म्हणजेच शाहरुखला बोलावून शोला सुरुवात केलेली नाही. सलमानसोबत त्याचे वडिल सलीम खान या टॉक शोमध्ये सहभागी होणार आहेत. १ डिसेंबरपासून कॉफी विथ करण सुरु होईल.