Salman Khan Arms License: बॉलिवूड अभिनेता सलमान खान मागच्या काही काळापासून त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तीत आयुष्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत आहे. सलमान खानला २ महिन्यांपूर्वीच बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षित वाढ करण्यात आली. सलमान खानने अलिकडेच बंदूक वापरण्याच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. आता त्याला स्वसंरक्षणासाठी बंदूक ठेवण्याचा परवाना मिळाला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच सलमानला पत्राद्वारे जीव मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्यामुळे त्याने स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवान्याची मागणी केली होती. सलमानने शस्त्र परवाना अर्जाबाबत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सलमान खानला हा परवाना देण्यात आला आहे.
आणखी वाचा- सलमान खानने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, धमकीच्या पत्रानंतर केली शस्त्रपरवान्याची मागणी
पोलिसांनी सांगितले की, परवाना मिळविण्याच्या प्रक्रियेनुसार, हा अर्ज पडताळणीसाठी पोलिस उपायुक्त (झोन ९) यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली होती. यामध्ये फौजदारी नोंदीही तपासण्यात आल्या. दस्तऐवज पडताळणी आणि गुन्हेगारीचा तपास केला असता, धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस मुख्यालयाने सलमान खानचा अर्ज मंजूर केला आहे.
पाहा व्हिडीओ –
दरम्यान ५ जून रोजी सलमान खानचे वडील सलीम खान आपल्या सुरक्षा रक्षकांसह बँडस्टँड येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. सकाळी ७.४० वाजता त्यांच्या सुरक्षा रक्षकाला “तुमची मूसेवालासारखीच अवस्था होईल” असे पत्र मिळाले. पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी मानसा गावात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.