सलमान खान आणि करिना कपूर खान यांच्या आगामी ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील ‘आज की पार्टी मेरी तरफ से’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. यापूर्वी प्रदर्शित करण्यात ‘आलेली सेल्फी लेले’,’ तू चाहिए’, आणि ‘भर दो झोली मेरी’ या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
सलमान हे चौथे गाणे ट्विटवरही टाकले आहे.
Yeh dekho . http://t.co/pDWXXWpIUg
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 3, 2015
‘आज की पार्टी’ या गाण्याचा चित्रपटात समावेश केलेला नसून, ते केवळ प्रमोशनल गाणे आहे. सलमानने त्याच्या चाहत्यांसाठी हे खास गाणे तयार केलेले आहे. दिल्लीत चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात ३०० बॅकग्राउन्ड डान्सर्स आहेत. शब्बीर अहमदने लिहलेल्या या गाण्यास प्रितमने संगीत दिले असून रेमो डिसोझाने कोरिओग्राफ केले आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ १७ जुलैला प्रदर्शित होईल.