गेले काही दिवस सलमान खान त्याच्या २००२ सालातील ‘हिट ऍंन्ड रन’खटल्यावरून चर्चेत आहे. मीडियामध्ये या प्रकरणी चर्चा होत असताना सलमानने याविषयी खुलेपणाने लोकांसमोर येण्याचे ठरवले आहे. यासाठी त्याने वेबसाईटचा सहारा घेण्याचे ठरवले असून  www.salmankhanfiles.com नावाची वेबसाईट तयार केली आहे. वेबसाईटवर या खटल्या संदर्भातील सर्व माहिती पुरवली जाणार असून खटल्यात होत असलेली प्रगती देखील येथे नोंदवली जाणार आहे.
“माझ्याविरूद्ध काही न्यायालयीन खटले दाखल केले गेले आहेत. मीडियामध्ये या खटल्यांविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. काही वेळेला या संदर्भात चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती मीडियामधून दिली जाते. त्यामुळे समाजातील माझ्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक  प्रतिमेला धक्का पोहोचतो. माझ्या न्यायालयीन खटल्यांविषयी सद्यस्थितीची माहिती सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी ही वेबसाईट तयार करण्याचा सल्ला मला दिला गेला.” अशाप्रकारचे सलमानचे निवेदन या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर देण्यात आले आहे.

Story img Loader