बॉलीवूडचा सर्वात चर्चित अविवाहित स्टार सलमान खान लवकरच विवाहित पुरूषांच्या क्लबमध्ये सामिल होणार आहे. मिड-डे या इंग्रजी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार दबंग खानच्या आयुष्यात एक नवीन तरूणी आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलिकडेच सलमान एका सोनेरी केसांच्या तरूणीसोबत वांद्रे येथे दिसला होता. परंतू ही तरूणी दुसरी तिसरी कोणी नसून रोमानियन टिव्ही कलाकार आणि सूत्रसंचालक लूलीआ वांन्तूर आहे. सलमान आणि लूलीआ गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत.
उपलब्ध माहितीनुसार सलमान आणि लुलीआला गेले काही दिवस दररोज वांद्रे येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये एकत्र पाहण्यात आले आहे.
सलमानचे नाव याआधी सोमी अली, संगीता बिजलानी. ऐश्वर्या राय आणि कतरीना कैफ यांच्यासोबत जोडण्यात आले होते. मात्र, आपल्या त्यांच्याशी असलेल्या नात्याबाबत कधीच जाहिरपणे खुलासा केलेला नाही. परंतू ताज्या बातमीनुसार, बॉडीगार्ड अभिनेता आपल्या या नात्याबाबत अतिशय गंभीर असून त्याला हे नातं लग्नगाठीपर्यंत न्यायचं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा