सलमान खान बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखला जातो. सलमानचे संपूर्ण कुटुंब बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. या यादीत सलमान खानची भाची अलीजे अग्निहोत्रीही सामील आहे. अलीजेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी सोशल मीडियावर तिचा लाखो फॅन्स आहेत. अलीजे या आधी सीमा खानच्या मॉडेलिंग असायनमेंट्समध्ये दिसली होती. अलीजे सरोज खान यांच्या डान्स क्लासला देखील जात होती. नुकताच तिने नवीन फोटो शूट केला असून सध्या तिचा हा फोटो शूट चर्चेत आहे.

अलीजे ही सलमानची मोठी बहीण अलिविरा आणि निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलीजेने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती एका ज्वेलरीच्या ब्रॅंडसाठी पोझ करताना दिसत आहे. यातील ज्वेलरीसोबतच तिच्या सुंदरतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा हे फोटो शूट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोत ती हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करत पोझ देत आहे. यात तिने त्या ड्रेसला साजेल अशी ज्वेलरी घातल्याचे दिसत आहे. तसंच तिने शेअर केलेल्या इतर फोटोत तिने घातलेली ज्वेलरी पाहायला मिळत आहे.

अलीजेने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहेत तिच्या सुंदरतेचे कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली, ‘अलीजे मस्तच’, दुसऱ्या युजर लिहिलं ‘हा लूक तुझ्यावर फार छान दिसतो आहे’. या आधी पण अलीजेने तिचे फोटो शूटचे फोटो शेअर केले होते, त्यावेळेस सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्टा शेअर करत, “अलीजे खूप छान दिसत आहेस”, असे म्हणत तिचे कौतुक केले होते. त्यामुळे आता अलीजे लवकरच बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आशी चर्चा रंगत आहेत.

Story img Loader