बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान याला अभिनयाव्यतिरिक्त विविध खेळातही रस आहे. एकीकडे अभिनय, गायन, कविता करणे, फिटनेस याबाबतीत तो सरत असताना आता दुसरीकडे सलमानचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान तिरंदाजी करताना दिसत आहे.

सलमान खानच्या फॅन पेजवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ गोव्यातील असल्याचं म्हटलं जात आहे. या ठिकाणी सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’चे चित्रीकरण सुरू आहे. व्हिडिओत सलमान तिरंदाजी करत आहे आणि त्याने सोडलेला तीर टार्गेटबोर्डवर अचूक निशाणा लागतो. सलमानचा हा निशाणा पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.

नुकताच ‘भाईजान’चा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बॉलिवूडचे बरेच कलाकार त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसला जमले होते. सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’ हा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. यात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader