बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा पुढील वर्षी २४ जानेवारीला प्रदर्शित होणा-या चित्रपटाचे शीर्षक ‘जय हो’ असे असण्याची शक्यता आहे.
यास दुजोरा देत चित्रपटाचा दिग्दर्शक सोहेल खान म्हणाला की, हो, चित्रपटाचे शीर्षक ‘जय हो’ असे ठरवण्यात आले आहे. मेंटल हे शीर्षक केवळ औपचारिकता म्हणून ठेवलेले नाव होते. तसेच, हे नवे शीर्षक त्याच्या वडिलांना म्हणजेच सलीम खान यांनाही आवडले असल्याचे त्याने सांगितले.
चित्रपटाचे ‘मेंटल’ हे शीर्षक सलमानने ठेवले होते. परंतु, प्रदर्शनाची तारीख २४ जानेवारी ठरवल्यामुळे सलीम खान यांना हे शीर्षक खटकले. तेव्हा २६ जानेवारीच्या अनुषंगाने चित्रपटाचे नाव देशभक्तीला साजेसे असावे, असे त्यांना वाटले. त्यामुळे चित्रपटाचे नाव ‘मेंटल’ बदलून ‘जय हो’ असे ठेवण्यात आले. भ्रष्टाचार निर्मूलनाचा संदेश देण्यात येणा-या या चित्रपटात सलमानने एका सामाजिक योद्धयाची भूमिका केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2013 रोजी प्रकाशित
जय हो… सलमान
बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमानच्या पुढील वर्षी २४ जानेवारीला प्रदर्शित होणा-या चित्रपटाचे शीर्षक 'जय हो' असे असण्याची शक्यता आहे.

First published on: 18-10-2013 at 12:34 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan plays a social crusader in jai ho