बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खानने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्याच्या आगामी ‘जय हो’ चित्रपटाच्या प्रसिद्धीकरीता तो तेथे गेला आहे. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
सलमान म्हणाला की, चौहान यांनी केलेल्या चांगल्या कामांमुळेच भाजपला सलग तिस-यांदा जनतेने मत दिले आहे. ते एक चांगले आणि योग्य व्यक्ती आहेत.  देशात चांगले काम करणा-या प्रत्येक व्यक्तीला माझा पाठिंबा आहे. उत्तरप्रदेशमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी झालेल्या वादाबद्दल विचारले असता तो म्हणाला, या प्रश्नाचे उत्तर मी यापूर्वीच दिलेले आहे. आम्ही आज इथे चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता आलो आहोत त्याचप्रमाणे आम्ही उत्तर प्रदेशला गेलो आणि आता गुजरातलाही जाणार आहे. आमचे देशभरात आणि देशाबाहेरही चाहते राहत असल्यामुळे मी प्रत्यके शहरात आणि भारताबाहेर चित्रपटाची प्रसिद्धी करणार आहे.
यावेळी सलमानने ७० वर्षीय रुक्मिणी बाईंची भेट घेतली. २७ डिसेंबर १९८५ साली जेव्हा सलमानचा जन्म झाला त्यावेळेस त्या कल्याणमल नर्सिंग होम, इंदौर येथे परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. रुक्मिणी यांच्या म्हणण्यानुसार, सलमानच्या जन्मानंतर त्यांनी दहा दिवस त्याची देखभाल केली होती.

Story img Loader