प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या ‘सलमान खान फिल्म्स’ (एसकेएफ) निर्मितीसंस्थेद्वारे बनत असलेला ‘हिरो’ हा पहिला चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होतो आहे. १९८३ साली आलेल्या दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या प्रसिद्ध चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटातून आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘कल हो ना हो’ चा दिग्दर्शक निखिल अडवाणी करीत आहे. सलमान खानच्या होम प्रॉडक्शनची निर्मिती असलेला ‘हिरो’ चित्रपट तीन जुलैला प्रदर्शित होणार असून, यात सुरज पांचोली आणि अथिया शेट्टी काम करत असल्याचे टि्वट निखिलने केले आहे. ‘एसकेएफ’ ही सलमानची दुसरी निर्मिती संस्था असून, याआधी ‘सलमान खान बिईंग ह्युमन’ (एसकेबीएच) या निर्मिती संस्थेद्वारे त्याने ‘चिल्लर पार्टी’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता हा नवा ‘हिरो’ पूर्वीच्या ‘हिरो’ला किती टक्कर देतो, ते पाहाण्यासाठी चित्रपटरप्रेमिंना ३ जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा