बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा लोकप्रिय अभिनेता आहेत. सलमानचे लाखो चाहते आहेत आणि त्यात मुलींची संख्या ही जास्त आहे. सलमानच्या रिलेशनशिपबद्दल जाणून घेण्याची इच्छा त्याच्या चाहत्यांना आहे. अनेक वेळा त्याचे चाहते त्याच्या लव्ह लाइफ विषयी त्याला प्रश्न विचारता. मात्र, बऱ्याच वेळी सलमान स्वत: त्याच्या रिलेशनशिपविषयी विनोद करताना दिसतो. आता सलमानने त्याच्या सगळ्यात जास्तकाळ टिकलेल्या रिलेशनशिपविषयी सांगितले आहे. तर त्या दोघांमध्ये एक साम्य आहे ते म्हणते त्या दोघांनी अजुनही लग्न केले नाही असं सलमान म्हणाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमानच्या रिलेशनशिपबद्दल तर सगळ्यांच माहित आहे. परंतु सलमानने सांगितलेल्या या नावाबद्दल क्वचितच कोणाला माहित असेल. सलमान लवकरच ‘बिग बॉस १५’ चे सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत सलमानने हा खुसाला केला आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी ३’ तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील यांच्यात इंदुरीकर महाराजावरून वाद

सलमानने म्हणाला, “त्याचं आणि ‘बिग बॉस’चं एकमेव रिलेशनशिप आहे, जे सर्वात जास्त काळ टिकलं आहे. ‘बिग बॉस’ हे एकमेव रिलेशनशिप आहे जे माझ्या आयुष्यात कायम आहे. ‘बिग बॉस’ आणि माझ्यात असलेलं साम्य म्हणजे आम्ही दोघांनी अजुन लग्न केले नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही भीतीशिवाय स्वतःला बॉस समजतो.”

आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा

सलमान पुढे म्हणाला, ” ‘बिग बॉस’सोबतचे माझे रिलेशनशिप कदाचित एकमेव असे रिलेशनशिप आहे जे इतके दिवस टिकले आहे. काही रिलेशनशिप तर, मी आता काय सांगू, पण बिग बॉसने माझ्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात स्थिरता आणली. जरी ४ महिने आम्ही एकमेकांना पाहू शकत नसलो. तरी जेव्हा आम्ही वेगळे होतो म्हणजेच सीझन संपतो तेव्हा आम्हाला पुन्हा भेटण्याची आतुरता असते.” यावेळी ‘बिग बॉस १५’ ची थीमही खूप खास आहे. सलमान खानच्या या शोची थीम जंगल आधारित आहे.यावेळी हा शो ५ महिने चालू शकतो अशा चर्चा सुरु आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan reveals his longest relationship says we both are still unmarried dcp