बॉक्स ऑफिसवर ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ या दोन्ही चित्रपटांनी भरभरून यश संपादन केल्यानंतर ‘दबंग ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे तर आपल्याला माहितीच असेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करेल याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र आपला भाऊ अरबाज खान ‘दबंग ३’चं दिग्दर्शन करणार नसल्याचं सलमान खानने स्पष्ट केलंय. त्यामुळे एखादा दुसरा चांगला दिग्दर्शक या चित्रपटासाठी शोधू असंदेखील सलमानने म्हटलंय.

अरबाज आणि सोहेल खानपैकी सोहेलनेच सलमानच्या बऱ्याच चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. सलमानच्या ‘औजार’, ‘जय हो’, ‘हॅलो ब्रदर’ आणि ‘प्यार किया तो डरना क्या’ यांसारख्या चित्रपटांसाठी सोहेलने दिग्दर्शन केलंय. तर अरबाजने फक्त ‘दबंग २’चं दिग्दर्शन केलंय.

वाचा : रणबीर करतोय कतरिनाला इन्स्टाग्रामवर फॉलो

सध्या सलमान आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनच्या कार्यक्रमात माध्यमांनी सलमानला त्याचा आवडता दिग्दर्शक कोण आहे असं विचारलं. याचं उत्तर देताना सलमान म्हणाला की, ‘आता अरबाजला दिग्दर्शन नाही करायचंय म्हणून सोहेल चांगला दिग्दर्शक आहे असं मला वाटतं कारण तो जास्त संयमी आहे. सोहेलसोबत काम करताना तु्म्ही स्वत:ला सुधारू शकता मात्र त्याच परिस्थितीत अरबाज लवकरच त्रस्त होतो आणि त्याचा रक्तदाब वाढू लागतो.’ त्यापुढे सलमान म्हणाला, ‘आता जेव्हा ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे तेव्हा अरबाज म्हणाला की खूपच छान पण मी याचं दिग्दर्शन करणार नाही, मी फक्त चित्रपटाची निर्मिती करेन. त्यावर मी त्यांना म्हणालो की खूपच छान, आम्ही एखादा चांगला दिग्दर्शक यासाठी शोधून घेऊ.’

PHOTOS : ‘ट्युबलाइट’चे बिहाइंड द सीन्स पाहिलेत का?

आता अरबाज खान ‘दबंग ३’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार नसल्याचे म्हटल्यावर सलमान कोणत्या दिग्दर्शकाला निवडेल हे पाहणं औत्सु्क्याचं ठरेल.

Story img Loader