प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांची भेट घेऊन स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना द्यावा, अशी मागणी केली. पंजाबचे प्रसिद्ध गायक सुद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान आणि त्यांचे पिता सलीम खान यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीपत्रानंतर सलमान खानने ही मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> “नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर…” घटस्फोटाबद्दल बोलताना सामंथा झाली भावुक

मुंबईतील वांद्रे परिसरात सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांचा उल्लेख करणारे एक पत्र सापडले होते. या पत्रात तुझा सिद्धू मुसेवाला करु, अशी धमकी सलमान खानला उद्देशून देण्यात आली होती. या धमकीपत्रानंतर खबरदारी म्हणून सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तर या धमकीनंतर सलमान खानने आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांची भेट घेतली. या भेटीत त्याने स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना द्यावा, अशी मागणी त्याने मुंबई पोलिसांकडे केली आहे. तसा रितसर अर्जदेखील सलमानने केला आहे.

हेही वाचा >> Love Storiya वरुन ट्रोलिंग : रणबीरची या ट्रोलिंगवरील प्रतिक्रिया तुम्हालाही पटेल; म्हणाला, “आजच्या…”

मागील महिन्यात मिळालेल्या धमकीवर सलमान खानने प्रतिक्रिया दिली होती. “मला हे पत्र मिळालेले नाही. माझ्या वडिलांना हे पत्र मॉर्निंग वॉकवर असताना मिळाले. आजकाल माझे कोणाशीही वैर नाही. माझ्याकडे कोणावरही संशय घेण्याचे कोणतेही ठोस कारण नाही. तसेच माझा अलीकडे कोणाशीही वाद झालेला नाही. कोणताही धमकीचा कॉल किंवा संदेश आलेला नाही,” असे सलमानला पोलिसांना सांगितले होते.

हेही वाचा >> “मी रणवीर सिंगची दुसरी पत्नी…” उर्फी जावेदचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

दरम्यान, सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर या प्रकरणी वांद्रे पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलमान खानला धमकी देण्यामागे लॉरेन्स बिष्णोई गँगचा हात असल्याचा संशय महाराष्ट्र गृहविभागाला होता.