एकाच चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या दोन सुपरस्टार नायकांमध्ये स्पर्धा, असणे ही बाब नवीन नाही. मात्र कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळी शाहरूख व सलमान या दोन खान बंधुंमध्ये या निकोप स्पर्धेच्या पुढे जाऊन चांगलीच ‘तूतूमैंमैं’ झाली. परिणामी ‘कुछ कुछ होता है’, ‘करण अर्जुन’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या या दोघांमध्ये गेला काही काळ शीतयुद्धही सुरू होते. मात्र भल्याभल्या राजकारण्यांमधील दरी सांधणाऱ्या इफ्तारच्या मेजवानीने या खानांनाही एकमेकांच्या गळ्यात गळे घालण्यास भाग पाडले. आमदार बाबा सिद्धिकी यांनी वांद्रय़ाच्या हॉटेल ताज लँड एण्ड्समध्ये दिलेल्या इफ्तार मेजवानीत या दोघांचे सूत पुन्हा जुळले.
ज्या कतरिनाच्या वाढदिवसाच्या दिवशी हे दोघे एकमेकांना भिडले होते, ती कतरिना सध्या रणबीर कपूरच्या मागे असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे परस्परांतील शीतयुद्ध आणि कडवटपणा इफ्तारच्या मेजवाणीत इराणी फिरनीसह गिळून टाकत त्यांनी एकमेकांना मिठीही मारली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jul 2013 रोजी प्रकाशित
‘इफ्तार’ मेजवानीत शाहरूख-सलमान मनोमिलन
एकाच चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या दोन सुपरस्टार नायकांमध्ये स्पर्धा, असणे ही बाब नवीन नाही. मात्र कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-07-2013 at 03:45 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan shah rukh khan end 5 year old rivalry hug each other at iftar party