सुरुवातीला मैत्री, त्यानंतर वाद-विवाद अन् आता पुन्हा मैत्री असंच काहीसं नातं सलमान आणि शाहरुख खानमध्ये आहे. दोघांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक वाट पाहत असतात. पुन्हा एकदा सलमान- शाहरुखने एकत्र एक चित्रपट करावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. आता हीच इच्छा पूर्ण होणार असल्याचं दिसतंय. तब्बल २७ वर्षांनंतर सलमान-शाहरुख एकाच चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहेत.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या बिनधास्त मुलीची मराठी मालिकेमध्ये एण्ट्री, मालवणी भाषा बोलताना दिसणार

सलमान-शाहरुख कोणत्या चित्रपटामध्ये दिसणार?
सलमान-शाहरुख लवकरच अ‍ॅक्शनपट चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहेत. कधीही न पाहिलेला सलमान-शाहरुखचा लूक यामध्ये पाहायला मिळणार असल्याचंही बोलल जात आहे. हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीमधील सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट असणार आहे. आदित्य चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करेल. सध्यातरी याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पण लवकरच याबाबत निर्माते घोषणा करतील असं देखील बोललं जात आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, आदित्य चोप्रा या चित्रपटावर गेल्या काही वर्षांपासून काम करत आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा यावर सध्या काम सुरु आहे. तसेच २०२३च्या अखेरीस किंवा २०२४च्या सुरुवातीला चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रीकरणासाठी सलमान आणि शाहरुखचा वेळ देखील निश्चित करण्यात आला असल्याचं समजतंय.

आणखी वाचा – Photos : ‘आई कुठे काय करते’मधील संजनाचं साडीमध्ये खुललं सौंदर्य, मनमोहक लूकची सोशल मीडियावर चर्चा

भारतीय चित्रपटसृष्टीमधील सगळ्यात महागडा चित्रपट
पिंकविलाच्या वृत्तानुसार, सध्यातरी या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. ‘टायगर ३’, ‘पठान’ चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतरच सलमान-शाहरुख या चित्रपटाच्या तयारीला लागणार आहेत. शिवाय हा भारतीय चित्रपटसृष्टीमधील सगळ्यात महागडा चित्रपट असणार आहे. म्हणजेच बॉलिवूडचे ‘करण अर्जुन’ पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader