हिट अँड रन खटल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानंतर अभिनेता सलमान खानने पुन्हा एकदा ‘बजरंगी भाईजान’च्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. त्यासाठी सलमान श्रीनगरमधील झोजी ला पास येथे दाखल झाला आहे. यावेळी दिग्दर्शक कबीर खानने सलमानसोबतचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. ‘बजरंगी भाईजान’च्या चित्रीकरणासाठी सलमान काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये दाखल झाला होता. हे चित्रीकरण आटोपल्यानंतर सलमान लगेचच सुरज बडजात्यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’च्या चित्रीकरणासाठी मुंबईत परतणार आहे. याशिवाय, जुलै महिन्यात आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली आणि सुनील शेट्टीची कन्या अथिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिरो’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमातही सलमान सहभागी होणार आहे. सलमान खानला सत्र न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविल्यानंतर बॉलीवूडला २५० कोटींचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिल्याने निर्माते आणि दिग्दर्शक लवकरात लवकर चित्रपट आटोपण्याच्या तयारीत आहेत.

Story img Loader