बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आणखी एक अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे. पूजाने आजवर बॉलिवूडमधील बऱ्याच टॉपच्या कलाकारांबरोबर काम केलं. रुपेरी पडद्यावर तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडल्या. आताही तिच्या हाती बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट आहेत. चित्रपटांमुळे चर्चेत असणाऱ्या पूजाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिने सलमान खानचं ब्रेसलेट घातलं आहे.
पूजाने सलमानचं ब्रेसलेट घालत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण तिने हे ब्रेसलेट का घातलं याचं कारण देखील फोटो शेअर करत सांगितलं आहे. सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटामध्ये पूजा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. म्हणूनच तिने सलमानचं ब्रेसलेट घालत चित्रीकरणाला सुरुवात असं म्हटलं आहे. पूजासाठी सलमानबरोबर काम करणं म्हणजे एक सुवर्णसंधी आहे.
आणखी वाचा – “आम्ही शांत बसणार नाही कारण…”, ‘द कश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
राघय जुयालची एण्ट्री
सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये डान्सर, सुत्रसंचालक राघव जुयालची देखील एण्ट्री झाली आहे. राघव सलमानच्या चित्रपटामध्ये दिसणार म्हटल्यावर त्याचे चाहते देखील खूप उत्सुक आहेत. याआधी राघवने स्ट्रीड डान्सर ३, नवाबजादे चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता या चित्रपटामध्ये त्याची भूमिका नेमकी काय असणारं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आणखी वाचा – अक्षय कुमारला पुन्हा एकदा करोनाची लागण, अभिनेता म्हणतो, “म्हणूनच मी आता…”
सलमान, पूजा, राघवबरोबरच या चित्रपटामध्ये आयुष शर्मा, जहीर इकबाल सारखे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या अॅक्शन सीन्सच्या चित्रीकरणालाही आता सुरुवात करण्यात आली आहे.