दबंग सलमान खान काय काय करेल याचा काही नेम नाही. त्याच्यात दडलेली कौशल्य आता हळू हळू बाहेर पडू लागली आहेत. टीव्हीवर ‘दस का दम’ आणि ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोंचे सूत्रसंचालन करून त्याने प्रेक्षकांवर छाप पाडलीच, पण त्यानंतर त्याने ‘नो एन्ट्री’च्या सिक्वलकरिता गाणेही लिहले.
पहाः ‘किक’मधील ‘जुम्मे के रात गाणे’
सूत्रसंचालक, गीतकार अशा विविध कौशल्य असलेला सलमान आता गायकही होणार आहे. साजिद नादयदवाला दिग्दर्शित ‘किक’ या चित्रपटात तो श्रेया घोशालसोबत एक रोमॅण्टिक गाणे गाणार आहे. या गाण्याचे शीर्षक ‘हॅन्गओव्हर’ असे असून, त्यास मीत ब्रदर्सने संगीत दिले आहे. काही दिवसांपूर्वीच मेहबूब स्टुडिओमध्ये हे गाणे पूर्ण करण्यात आले.
पाहा सलमान खानच्या ‘किक’चा ट्रेलर
नरगिस फक्री या चित्रपटात खास गाणे करणार असल्याचीही चर्चा सुरु आहे.

Story img Loader