बॉलिवूडचा दबंग म्हणजेच अभिनेता सलमान खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमानचा चाहतावर्ग तर फक्त देशभरातच नव्हे तर जगभरात आहे. सलमानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरलेले असतात. बॉलिवूडमधील बरेच कलाकार एखादा चाहता आपल्याला भेटायला आला की त्याचं आदराने स्वागत करतात किंवा चाहत्यांच्या गर्दीत कंटाळून न जाता त्यांचं प्रेम हसतमुखाने स्वीकारतात. पण सलमान मात्र याला अपवाद आहे असंच आता म्हणावं लागेल. नुकतंच त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून याचा प्रत्यय येतो.

नेमकं काय घडलं?
सलमानचा राग किंवा एखाद्याप्रती तो कसा वागतो? याबाबत नेहमीच चर्चा रंगताना दिसते. आता देखील त्याने त्याच्या चाहत्याला ज्याप्रकारे वागवलं त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. सलमान मुंबई विमानतळावर पोहोचताच एक चाहता त्याच्यासाठी भेटवस्तू म्हणून फोटोफ्रेम घेऊन आला होता. पण या चाहत्याला त्याने फार चांगली वागणूक दिली नाही.

Neil Nitin Mukesh
नील नितीन मुकेशला अधिकाऱ्यांनी घेतलं होतं ताब्यात; न्यूयॉर्क विमानतळावरील प्रसंग सांगत म्हणाला…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
Saif Ali Khan attack case Mental health Titwala suspect
Video : सैफ अली खान हल्ला प्रकरणात पकडलेल्या टिटवाळ्यातील संशयित तरूणाच्या मनावर परिणाम? कुटुंबीयांची खंत
remo dsouza attend mahakumbh mela
Video : जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर चेहरा लपवून महाकुंभमेळ्याला पोहोचला अन्…; बॉलीवूड कोरिओग्राफरचा व्हिडीओ व्हायरल
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”

आणखी वाचा – VIDEO : स्कॉट्स, वेटलिफ्टिंग अन्…; प्रिया बापटचा फिटनेस फंडा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…

तो चाहता जेव्हा सलमानला भेटायला आला आणि त्याला फोटो फ्रेम देऊ लागला तेव्हा काही वेगळंच घडलं. सलमानच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. चाहत्याला पाहून त्याने विचित्र चेहरा केला. साधं हसू देखील त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं. कसाबसा सलमानने चाहत्याबरोबर फोटो काढला. पण सलमानचं हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. त्याच्या या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

आणखी वाचा – ज्ञानवापीमधील लीक व्हिडीओसंदर्भात अक्षय कुमारने स्पष्टपणे मांडलं मत; “ते शिवलिंग आहे असं…”

सलमानच्या वागण्यावर अनेकांनी प्रश्न निर्माण केले. एका युजरने म्हटलं आहे की, तु मला आवडायचास पण यापुढे ते शक्य नाही. तर काही युजर्सने हे वागणं चांगलं नाही अशा प्रकारच्या बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. सुप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांच्या निधनानंतर सलमानच्या सुरक्षिततेही वाढ झाली आहे. जवळपास सलमानच्या सुरक्षिततेसाठी ६ सुरक्षारक्षक वाढवण्यात आले आहेत.

Story img Loader