‘बँग बँग’च्या चित्रीकरणादरम्यान मेंदूला झालेली दुखापत, त्यानंतर झालेली शस्त्रक्रिया यातून सावरायचा प्रयत्न करणाऱ्या हृतिक रोशनला सगळ्यात मोठा धक्का दिला तो त्याची पत्नी सुझान खानने! सुझान खानने हृतिकपासून वेगळे व्हायचा निर्णय घेतल्यानंतर तिने स्वतंत्रपणे आपले वैयक्तिक आयुष्य नव्या जोमाने सुरू केले असले तरी हृतिक मात्र त्या दु:खातच अडकून पडला आहे. यातून मार्ग कसा काढायचा हे अजूनही लक्षात न आलेल्या हृतिकला सावरण्याचा प्रयत्न बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानने केला आहे.
सुझान खानचा निर्णय प्रसिद्धिमाध्यमांकडे जाहीर करण्यापासून ते ‘क्रिश थ्री’च्या व्यावसायिक यशाबद्दल उठलेल्या अफवांना गंभीरपणे उत्तरे देणारा हृतिक रोशन सध्या गोंधळलेल्या स्थितीत आहे. एरवी, बॉलिवूडमधील कुणाचेही दु:ख हलके करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या सलमानलाही हृतिकची ही स्थिती पाहवली नाही. त्याने पनवेल येथील आपल्या फार्महाऊसवर झालेल्या पार्टीत हृतिकला  सलमानशी बोलण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हृतिक सलमानच्या घरी दाखल झाला. जवळजवळ दीड तास त्यांच्यात गप्पा झाल्या.
सलमानने हृतिकला काय सल्ला दिला हे कळलेले नाही. पण आता दु:खात असलेल्या हृतिकला त्याने मागचे शत्रुत्व विसरून आधार दिला. खरे तर ‘गुजारिश’ चित्रपटात हृतिकच्या अभिनयाबाबत सलमानने काही शेलकी विधाने केली होती. त्यामुळे हृतिकनेही सलमानशी बोलणे थांबविले होते. गेले दीड-दोन वर्षे ते एकमेकांशी बोलले नाहीत. याच कारणास्तव हृतिकने ‘क्रिश थ्री’च्या प्रसिद्धिसाठी बिग बॉसच्या सेटवर जाणेही टाळले. दु:ख दोन माणसांमधील अंतर कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतं. तशीच काहीशी अवस्था या दोघांच्या बाबतीत झाली आहे. सलमानने हृतिकला आधाराची गरज आहे हे ओळखून सलमानने त्याला हाक दिली आणि हृतिकनेही कुठलाही आडपडदा न बाळगता मनमोकळेपणी सलमानकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.

Story img Loader