बॉलिवूडच्या ‘भाईजान’शी पंगा घेऊ नका असं म्हटलं जातं. अभिनेत्री प्रियांका चोप्राला सलमानच्या चित्रपटाला ऐनवेळी नकार देणं चांगलंच महागात पडलं आहे. ऐनवेळी ‘भारत’ चित्रपटाला नकार देत तिनं सलमानला डच्चू दिला. याआधीही सलमानने प्रियांकावर नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा त्याने प्रियांकाला उपरोधिक टोला लगावला आहे.

‘भारत’ चित्रपटात ऐनवेळी प्रियांकाची जागा कतरिना कैफने घेतली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कतरिनाला चित्रपटासाठी कशाप्रकारे तयारी केली असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, ‘केस आणि लूक ठरल्यानंतर मला तयारीसाठी दोन महिने लागले.’ कतरिना हे बोलत असतानाच सलमानला तिला थांबवत मधेच म्हणाला, ‘प्रियांकाने आम्हाला फार वेळ दिला नाही.’ प्रियांकाने ऐनवेळी भूमिकेला नकार दिल्याने सलमानवर ‘भारत’च्या चित्रीकरणाच्या एक आठवड्याआधी मुख्य अभिनेत्री शोधण्याची वेळ आली होती. प्रियांकाचं अव्यवहारिक वागणं सलमानला अजिबात रुचलं नव्हतं.

तुला पाहते रे: विक्रांत सरंजामेला फार आवडतो सोशल मीडियावरील हा मीम

प्रियांका आणि सलमान ‘भारत’ चित्रपटाच्या निमित्तानं दहा वर्षांनंतर एकत्र येणार होते. त्यांच्यामध्ये पूर्वीपासून वाद होता. हा वाद मिटवण्यात सलमानची बहिण अर्पितानं पुढाकार घेतला होता. मात्र प्रियांकाच्या अव्यवहारिक वागण्यामुळे दुखावलेल्या सलमाननं तिच्यासोबत भविष्यात काम न करण्याच्याही निर्णय घेतला आहे.