जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान एका प्रसंगात चेह-यावरील हावभाव व्यवस्थित नसल्याने पुन्हा तो प्रसंग करावा, या विनंतीवरून दबंग सलमानने पुन्हा शाहरूखला चिमटा काढला आहे. 
सत्तेचाळीस वर्षीय अभिनेता सलमान खान मुंबईत एका जाहिराचीच्या चित्रिकरणादरम्यान, त्याला पुन्हा चालण्यास सांगितले असता तो म्हणाला, ‘जर फक्त चालायचेच होते, तर कोणत्यातरी मॉडेलला घ्यायचं होतं, माझी गरज काय होती?’
त्यानंतर आपल्या मागणीवर अडून बसलेल्या दिग्दर्शकाने सलमानला अतिजवळच्या शॉटसाठी चेह-यावर आणखी हावभाव देण्याची विनंती केली तेव्हा तो म्हणाला की, ‘जर अभिनयच करायचा आहे, तर ह्रतिक रोशनला बोलवायचं होतं.’
पण इथेच तो थांबला नाही आणि तो म्हणाला, ‘आणि जर ओवर अॅक्टींगच करायची होती तर शाहरूखला बोलवायचं होतं.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan targets shah rukh khan again