बॉलीवूडच्या दबंग खानच्या दिलदारपणाबाबत काही वेगळे सांगायला नको. त्याने अनेक कलाकारांना बॉलीवूडमध्ये येण्यास मदत केली आहे. पण, त्याने यावेळी वेगळ्याच प्रकारची मदत एका नवोदित बॉलीवूड अभिनेत्रीला केली आहे. पॉर्न स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सनी लिओनीला त्याने चक्क साडी नेसायला शिकवले.
सनी लिओनीला साडीचा ‘स’ तरी माहित असणार का? मगं काय सल्लू मिया मदतीला धावला. स्टार गिल्ड पुरस्कारात त्याने सनीला साडी नेसवली. पण, आपल्या चेष्टा करण्याच्या सवयीप्रमाणे त्याने नंतर सनीला टोलाही हाणला. तो म्हणाला की, मै तुम्हे साडी पहनाने का गुर सिखा रहा हूँ, क्योकि तुम इसे उतारने मै माहिर हो. असो परंतु, सलमानने साडी नेसवण्याचे धडे दिल्यानंतर यापुढे आपण सनीला साडीत पाहण्याची अपेक्षा करायला काही हरकत नाही.

Story img Loader