बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट देणारी सलमान खान आणि सूरज बडजात्या ही जोडी पुन्हा एका चित्रपटासाठी एकत्र आलीये. या नव्या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले, तरी त्याचे चित्रिकरण जून २०१४ पासून सुरू होऊन, चित्रपट २०१५ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानची प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली असून, अन्य कलाकारांची निवड होणे अजून बाकी आहे.
सुरज बडजात्यांना सलमान खानबरोबर काम करता यावे, यासाठी बोनी कपूरने सलमान खान काम करत असलेल्या ‘नो एन्ट्र में एन्ट्री’ या चित्रपटाच्या तारखांच्या नियोजनात बदल केला आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने सुरज बडजात्या ८ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या आधी ‘हम आप के है कोन’ या चित्रपटासाठी सलमान खान आणि सुरज बडजात्या यांनी एकत्रित काम केले आहे.
सलमान खान आणि सुरज बडजात्या पुन्हा एकत्र!
बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट देणारी सलमान खान आणि सूरज बडजात्या ही जोडी पुन्हा एका चित्रपटासाठी एकत्र आलीये. या नव्या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले, तरी त्याचे चित्रिकरण जून २०१४ पासून सुरू होऊन, चित्रपट २०१५ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
First published on: 03-06-2013 at 10:00 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodसलमान खानSalman Khanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan teams up with sooraj barjatya after hum aapke hain koun