मुंबईत शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या धर्मवीर चित्रपटाचं ट्रेलर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाँच करण्यात आलं. यावेळी अभिनेता सलमान खानने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव घेत आनंद दिघे आणि त्याच्या आयुष्यातील दोन साम्य असणाऱ्या गोष्टींवर मिश्किल वक्तव्य केलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सलमान खान म्हणाला, “उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांनी आनंद दिघे यांच्याविषयी एक खूप चांगली गोष्ट सांगितली. ती मला माझ्यात आणि त्यांच्यात सारखी वाटली. ती गोष्ट म्हणजे ते एकाच बेडरुममध्ये राहत होते आणि मी देखील एकाच बेडरुममध्ये राहतो. यानंतर माझं आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी आमच्यातील आणि एक समान गोष्ट सांगितली. आनंद दिघे यांचंही लग्न झालं नव्हतं आणि माझंही लग्न झालेलं नाही.”

हेही वाचा : रानू मंडल आणि सलमान खानची जुगलबंदी? व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

सलमान खानच्या या मिश्किल वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. “याआधी एक चित्रपट आला होता त्याचं नाव धरम वीर होतं. आता हा चित्रपट धर्मवीर नावाने येत आहे. तो धरम वीर चित्रपट जेवढा चालला तेवढाच हा धर्मवीर चित्रपटही चालावा,” अशी आशाही सलमान खानने व्यक्त केली.