बॉलिवूड अभिनेत्रींमधील टॉप अभिनेत्रीपैकी एक म्हणून कतरिना कैफला ओळखले जाते. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी फोन भूत या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या ४ नोव्हेंबरला तिचा फोन भूत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सध्या कतरिना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच तिने बिग बॉसच्या १६ व्या पर्वात हजेरी लावली. यावेळी सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळाली. या कार्यक्रमात सलमान खानने कतरिनाचा पती अभिनेता विकी कौशलबद्दल स्पष्ट भाष्य केले.
कतरिना ही सध्या फोन भूत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिनाही भूत रागिणी हे पात्र साकारत आहे. तर दुसरीकडे भूत पकडणारे ‘घोस्टबस्टर’ गुल्लू आणि मेजर यांची भूमिका सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर साकारत आहेत. नुकतंच या तिघांनी बिग बॉसमध्ये हजेरी लावली. यावेळी सलमानने कतरिनाच्या आग्रहाखातर टिप टिप बरसा पानी… या गाण्यावर डान्स केला. यावेळी मंचावर काही हॉरर गेमही खेळण्यात आले.
आणखी वाचा : “शिवाजी नाट्यमंदिरपासून सुरु झालेला प्रवास…” अंकुश चौधरीने पत्नीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
नुकतंच या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सलमान हा कतरिनाच्या अनेक प्रश्नांची उत्तर देताना दिसत आहे. यावेळी कतरिना कैफने सलमान खानला विचारले, “जर तू भूत बनला तर तुला कोणावर नजर ठेवायला आवडेल?” यावर सलमानने अगदी क्षणाचाही विलंब न करता “एक व्यक्ती आहे, ज्याचे नाव विकी कौशल आहे”, असे उत्तर दिले. सलमानचे हे उत्तर ऐकून कतरिना जोरजोरात हसू लागली.
त्यापुढे सलमान खान म्हणाला, “तो प्रेमळ आहे, काळजी घेणारा आहे, धीट आहे आणि त्याच्याविषयी बोललो की तू ब्लश करतेस.” सलमान आणि कतरिनाच्या या संवादाचा व्हिडीओ कलर्स वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा : “माझ्या मित्राचा संसार…” केदार शिंदेंनी अंकुश चौधरीच्या पत्नीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान कतरिनाचा आगामी फोन भूत हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचाही समावेश आहे. हा एक हॉरर-कॉमेडी स्वरुपातील चित्रपट आहे. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. तर लेखन रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंट द्वारे केली जात आहे.