बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. मदत करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये सलमानचं नावं देखील असतं. सलमान खान आता कोटींमध्ये कमाई करत असला तरी एकेकाळी त्याच्याकडे पैशांची फार कमतरता होती. नुकत्याच दिलेल्य एका मुलाखतीत सलमानने खुलासा केला आहे की, त्याच्याकडे पैसे नसताना चित्रपटसृष्टीतील लोकांनी त्याला कशी मदत केली.

आणखी वाचा : ‘दुख भरा प्रेम गीत’ ऑप्शन देत अमृता फडणवीसांचं पॉझिटिव्ह ट्विट; नेटकऱ्यांनाही आवाहन

यावेळी सलमानने बॉलिवूडचे निर्माते बोनी कपूर यांचे आभार मानले आहे. सलमानने बोनी कपूर यांना मिठी मारली आणि म्हणाला, “बोनी जींनी मला आयुष्यभर मदत केली. जेव्हा माझे करिअर खडतर टप्प्यातून जात होते, तेव्हा बोनीजींनी मला ‘वॉन्टेड’ हा चित्रपट दिला ज्यामुळे मी परत आलो.”

आणखी वाचा : मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या Arangetram सोहळ्यात, सलमान- आमिरसोबत ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

आणखी वाचा : मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या Arangetram सोहळ्यात, सलमान- आमिरसोबत ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

पुढे सलमान विनोदाच्या स्वरात म्हणाला, “यानंतर बोनीजींनी मला ‘नो एंट्री’ चित्रपट दिला ज्यामुळे अनिल कपूर पुन्हा एन्ट्री करू शकले. सलमानच्या या बोलण्यावर कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले.”

आणखी वाचा : IMDb नुसार हे आहेत भारतातील टॉप ८ कॉमेडी चित्रपट, तुम्ही यापैकी कोणते पाहिलेत?

याशिवाय सलमानला अभिनेता सुनील शेट्टीनेही मदत केली होती. सलमानकडे कपडे घ्यायला पैसे नसताना सुनील शेट्टीने त्याला शर्ट घेऊन दिला होता. दरम्यान, सलमान लवकरच ‘टायगर ३’, ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय सलमान शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटात पाहूण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Story img Loader