चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी अनोखे मार्ग अवलंबविणारा अभिनेता म्हणून आमिर खानची ख्याती आहे. आता त्याच्याच पऊलावर पाऊल ठेवत सलमान खान ‘जय हो’ या आगामी चित्रपटाची अनोख्या मार्गाने प्रसिध्दी करतोय. याचाच एक भाग म्हणून सलमानने टि्वटरवरील त्याच्या ५.५ दशलक्ष चाहत्यांना चित्रपटाचे पोस्टर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे निमंत्रित दिले. सलमानने टि्वटरवरी संदेशात म्हटले होते – “कल सुबह १० बजे इंडिया टाईम पे लिंक मिलेगा. क्लिक करो ओर मेरे साथ ‘जय हो’ का पहला पोस्टर बनाओ. सुबह १० बजे इंडिया टाईम ओके?” जेव्हापासून सलमानने हा संदेश टि्वटरवर पोस्ट केला, तेव्हापासून टि्वटरवर याचाच बोलबाला आहे. #jaiHoPosterToday ने सोशल नेटवर्किंग साईटवरील टॉप टेन ट्रेन्डिंग शब्दांमध्ये स्थान मिळवले.
चाहत्यांच्या मदतीने तयार झालेले ‘जय हो’ चित्रपटाचे पॉस्टर सलमानने टि्वटरवर प्रसिध्द केले. हे पोस्टर बनविण्यात चाहत्यांनी केलेल्या मदतीसाठी सलमानने त्यांचे आभार मानले. टि्वटरवर प्रसिध्द केलेल्या संदेशात तो म्हणतो – “ये लो बन गया अपना ‘जय हो’ का पोस्टर http://goo.gl/Evf75Q धन्यवाद.”
सलमानने केलेल्या अवाहनाला चाहत्यांचा एवढ्या मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला की, सकाळी काही काळासाठी साईट बंद पडली. त्यावर “थॅक्स फॉर द अमेझिंग रिस्पॉन्स. लगता है सर्व्हर ही क्रॅश हो गया! विल बी अप सून.” असा संदेश त्याने पोस्ट केला.

Story img Loader