सलमान सध्या त्याच्या आगामी ‘जय हो’ चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे. त्यासाठी तो आता नागपूरला गेला आहे. सलमानला पाहून त्याचे चाहते अक्षरशः वेडे झाले होते आणि त्यातच धक्काबुक्कीचा प्रसंग तेथे झाला. यात लहान मुलांना इजा होऊ नये किंवा कोणालाही हानी पोहचू नये म्हणून सलमानने सर्वांना आपले लांबूनच कौतुक करण्याचा सल्ला दिला. आपण सर्वांच्या प्रेमाचा आदर आणि कौतुक करत असल्याचे तो म्हणाला.
सलमानने नुकतीच १.२८ कोटी रुपयांची ऑडी७ स्पोर्टबॅक कार विकत घेतली आहे. ही गाडी विकत घेणारा तो भारतातील पहिला ग्राहक आहे. ही गाडी भेटवस्तू स्वरुपात तो कोणत्या बॉलीवूड सेलिब्रेटीला देईल, असे विचारले असता सलमान म्हणाला की, या गाडीत कतरिना खूप छान दिसेल. पण, ऑडी७ स्पोर्टबॅक कार कतरिनाला भेट स्वरुपात देण्याचा सलमानचा काही विचार नाही. तसेच, यावेळी त्याने गाडी सांभाळून चालविण्याचा आणि गाडीत बसलेल्या व बाहेरच्या व्यक्तींची काळजी घेण्याचा सल्लाही सर्वांना दिला.

Story img Loader