बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान काही वर्षांपासून मुंबईतील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणपतीचे स्वागत करायचा. मात्र, सलमानच्या वांद्रयाच्या घरी यंदा गणरायाचे आगमन होणार नाही. वांद्रा ऐवजी त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर गणरायाचे आगमन होणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर्षी वांद्राच्या घरी नूतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे आणि ते काम वेळेत पार न पडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण, अद्याप गणरायाचे आगमन कुठे होणार याबाबतचा निर्णय निश्चित झालेला नाही. तसेच यंदाच्या गणपतीची मूर्ती ही इको फ्रेन्डली असणार आहे.
सलमानच्या बहीणी अर्पिता आणि अलविरा या दोघी गणेश चतुर्थीसाठी सजावटीचे काम पाहणार आहेत.