सुपरस्टार सलमान खान अतुल अग्निहोत्रीच्या होम प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान आणि करिना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बॉडिगार्ड’ चित्रपटानंतर अतुल ‘ओ तेरी’ हा चित्रपट घेऊन येत आहे.
अतुल म्हणाला, या चित्रपटात सलमानची एक छोटीशी भूमिका असून, तो एका गाण्यात आणि चित्रपटातील काही दृश्यांमध्ये दिसणार  आहे. २००४ मध्ये आलेल्या ‘दिल ने जिसे अपना कहा’ या सलमान, प्रिती झिंटा आणि भूमिका चावला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाद्वारे अतुलने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर २००८ मध्ये त्याने ‘हॅलो’ नावाचा चित्रपट केला होता, ज्यात सलमानने एक छोटीशी भूमिका केली होती.

Story img Loader