बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहात दोन्ही ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि सलमानने चित्रपट प्रदर्शनाच्या आधी एक घोषणा केली आहे. करोनाच्या वाढत्या संक्रमणाला पाहता राधे चित्रपटातून मिळालेली रक्कम ही गरजूंच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सलमान खान फिल्म्स आणि झी इंटरटेनमेंट इंटरप्रायजेस लिमिटेड हे ‘गिव्ह इंडिया’ या संस्थेसोबत एकत्र आले आहेत. त्यांनी या संस्थेसोबत एकत्र येऊन गरजूंना मदत करण्याचे ठरवले आहे. चित्रपटाच्या रेव्हेन्युने करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर्स, औषध आणि व्हेंटिलेटर्सची मदत केली जाणार आहे. करोनामुळे ज्या लोकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. अशा लोकांना काम दिले जाणार असल्याचे दोन्ही कंपन्यांनी सांगितले आहे.
View this post on Instagram
सलमान खान फिल्म्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “या चांगल्या उपक्रमाचा भाग झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. आम्हाला करोनाच्या विरोधात असलेल्या देशाच्या या लढाईत हातभार लावायचा आहे. गेल्या वर्षापासून आपण करोना संसर्गाविरुद्धोधात लढण्याचा प्रयत्न करत आहोत. करोनाचा परिणाम आपल्या देशासोबतच जगावर झाला आहे.”
View this post on Instagram
ते पुढे म्हणाले,”आम्हाला असेही जाणवले की चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याने कोणत्याही प्रकारची मदत होणार नाही. तर त्याला प्रदर्शित करत त्यातून येणाऱ्या पैशांनी करोनाशी लढायला मदत करता येईल.”
View this post on Instagram
दरम्यान, ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.