सूरज बरजात्या यांच्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात सलमान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. यात तो प्रेम आणि विजय या भूमिका साकारणार आहे.
तब्बल १५ वर्षांनंतर सलमान सूरज बरजात्यासोबत काम करणार आहे. बरजात्याच्या ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘हम साथ साथ है’ या चित्रपटांमध्ये सलमानचे नाव ‘प्रेम’ होते. सलमान चित्रपटात दुहेरी भूमिका करणार आहे. यापूर्वी आम्ही राम और श्याममध्ये दिलीप कुमार आणि जुडवामध्ये सलमानला दुहेरी भूमिकेत पडद्यावर आणले होते. त्यास चागंला प्रतिसादही मिळाला होता. या चित्रपटातील दोन्ही भूमिका या वेगवेगळ्या असतील. यात दोन्ही भूमिका सकारात्मक असणार आहेत. एका मनोरंजक पात्राची भूमिका तो साकारणार आहे, अशी माहिती सूत्रांनी पीटीआयला दिली आहे. चित्रपटात सोनम कपूर सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसेल. तर निल नितीन मुकेश, स्वरा भास्कर आणि दीपक डोब्रियाल हे अनुक्रमे सलमाच्या भावाची, बहिण आणि मित्राची भूमिका साकारणार आहेत. संजय मिश्रा आणि अनुपम खेर हे दोघेही मजेशीर भूमिकेत दिसणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
‘प्रेम रतन धन पायो’च्या चित्रीकरणास जून महिन्यात सुरुवात होणार असून त्याच हिमेश रेशमिया संगीत देणार आहे.
‘प्रेम रतन धन पायो’मध्ये सलमानची दुहेरी भूमिका
सूरज बरजात्या यांच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटात सलमान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
First published on: 25-03-2014 at 12:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan to play double role in prem ratan dhan payo