पाकिस्तानची सून म्हणून उल्लेख केल्यामुळे नाराज झालेल्या टेनिसपटू सानिया मिर्झाने कोणीही जितक्या वेळा माझा परदेशी म्हणून उल्लेख करेल तितक्या वेळा मी त्याचा निषेध करेन, या शब्दांत आपली भावना गुरुवारी व्यक्त केली. त्यानंतर बॉलीवूडमधील अनेकजण सानियाची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावले होते. सानियाने घेतलेल्या या ठाम पवित्र्याने दबंग खान सलमान चांगलाच प्रभावित झाला आहे. “वाह यार! सानिया मिर्झा, कमाल करती हो! लाईक द स्पिरीट” अशा आशयाचे ट्विट करून सलमानने सानियाचे कौतुक केले . सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीदेखील सानियाला विनाकारण या वादात ओढले जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

Story img Loader