यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्याला सलमान उपस्थित राहणार नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. सलमान त्याच्या ‘मेंटल’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे मकाउ येथे होणा-या आयफा पुरस्कार सोहळ्याला जाउ शकणार नसल्याचे त्याने ट्विट केले आहे. त्याची स्वतःची निर्मिती असलेल्या ‘मेंटल’ चित्रपटाच्या चित्रीकरणात सलमानची तब्येत ठीक नसल्यामुळे आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे आधीच व्यत्यय आलेला आहे.
यावेळच्या आयफा पुरस्काराचे यजमानपद शाहरुख खानकडे आहे. आयफाचे सूत्रसंचालन करणारे शाहीद कपूर, विद्या बालन, कंगना रनावत, हुमा कुरेशी, जॅकलीन फर्नांडीस हे १४व्या आयफा पुरस्कारासाठी मकाउला पोहोचले आहेत. तर अभिषेक बच्चन या पुरस्काराने पुनरागमन करत आहे.

Story img Loader