‘मेंटल’ चित्रपटातील सहकलाकार सना खान हिची बाजू सांभाळून घेत सलमानने शनिवारी ट्विटरवर ‘टिव टिव’ केली आहे. पंधरा वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सना खानवर आहे. मात्र, सना सध्या फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. एकीकडे सनासारख्या आत्ताच नावारूपाला येत असलेल्या अभिनेत्रीने अपहरणासारखे कृत्य करण्याचे कारण काय, याचा तपास सुरू असतानाच सलमानने मात्र सनालाच गरीब, बिचारी ठरवत तिच्यावर आरोप करणाऱ्यांना प्रसिद्धीसाठी सवंगगिरी करणाऱ्यांच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे.
सलमान सूत्रधार असलेल्या बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सना खान होती. त्यानंतर सोहैल खानने आपल्या ‘मेंटल’ या चित्रपटासाठी सनाला करारबद्ध केले. सनाने सलमान आणि मंडळींबरोबर ‘मेंटल’चे काही चित्रीकरणही केले आहे. आता तिच्या अचानक गायब होण्यामुळे चित्रीकरण रखडले असल्याचे बोलले जात आहे. सनाला ‘बिग बॉस’च्या सेटवर सर्वानीच पाहिले आहे याचा दाखला देत, ‘तुम्ही सनाला रोजच्या रोज बिग बॉसच्या सेटवर तीन महिने बघत होता. ती असे काही क रेल असे तुम्हाला वाटते काय,’ असा बालिश प्रश्न सलमानने ट्विटरवर केला आहे. तुम्ही काहीही छापू शकता मग ते कितीही चुकीचे असे ना.. अशा शब्दांत त्याने आपला राग व्यक्त केला आहे.
सनासारखी अभिनेत्री एखाद्या १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण कशाला करेल? पैशासाठी की लग्नासाठी आणि तेही संध्याकाळी चार वाजता एखाद्या गजबजलेल्या भागात.. हे कसे शक्य आहे? तुम्ही आधी तक्रार काय आहे ती नीट तपासा, असा शहाजोग सल्ला त्याने पोलिसांना दिला आहेच.

Story img Loader