जॉन अब्राहमचा अभिनय असलेल्या ‘फोर्स’ चित्रपटानंतर राष्ट्रीय पारितोषिक विजेता दिग्दर्शक निशिकांत कामत सध्या ‘लई भारी’ या मराठी चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात रितेश देशमुखची मुख्य भूमिका असून चित्रपटात रितेश हा एकटाच बॉलिवूड स्टार नसून त्याच्या जोडीला बॉलिवूडचा अघाडीचा अभिनेता सलमान खान  एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हैदराबाद येथे  चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, निशिकांतच्या दिग्दर्शनाखाली सलमान खान काम करीत आहे. या चित्रपटात सलमानने काम करण्याबाबत निशिकांत अतिशय उत्सुक होता. चित्रपटातील सलमानच्या भूमिकेबाबत निशिकांतने अधिक काही खुलासा केला नसला, तरी सलमान खान या चित्रपटात एका मराठी माणसाची भूमिका साकारत असल्याची चर्चा सुरू आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader