एका सर्वेक्षणानुसार ख्यातनाम व्यक्तींमध्ये बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा मोबाइलवर सर्वाधिक ऑनलाइन सर्च केला गेला आहे. ‘दबंग २’, ‘एक था टायगर’ यांसारखे हिट चित्रपट देणा-या सलमानने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पूर्वाश्रमीचा प्रेयसी कतरिना यांना मागे टाकून पहिले स्थान पटकाविले आहे.
मोबाइल वेब व्हिडीओ शोध कंपनी ‘वुक्लीप्स’च्या यावर्षातील दुस-या तिमाही सर्वेक्षणानुसार ‘बर्फी’ अभिनेता रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, राष्ट्रीय पुरस्कार विजेती दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणी आणि अभिनेत्री-गायिका निथ्या मेनन यांचा ‘टॉप-१०’च्या यादीत समावेश आहे. या यादीत टीव्ही कलाकार कीम कर्दाशियन आणि गायिका टेलर स्विफ्ट यांना अनुक्रमे पाचवे आणि आठवे स्थान मिळाले आहे.
सलमान खानसाठी सर्वाधिक ऑनलाइन सर्च
एका सर्वेक्षणानुसार ख्यातनाम व्यक्तींमध्ये बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा मोबाइलवर सर्वाधिक ऑनलाइन सर्च केला गेला आहे.
First published on: 01-08-2013 at 08:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan tops indias most searched celeb list online