बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सलमानचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच त्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत सलमानने त्याच्या एका चाहत्याच्या लग्नात हजेरी लावल्याचे सांगितले आहे. २२ डिसेंबर रोजी सलमान मुंबईत असलेल्या या लग्नात गेला होता. सलमानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

आणखी वाचा : Big Boss Marathi 3 नंतर अभिनेता विशाल निकम अडकणार लग्न बंधनात?

सलमानला या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला की, “सलमानला कतरिनाच्या लग्नाचे आमंत्रण मिळाले नव्हते.” दुसरा नेटकरी म्हणाला, “भाई स्वत:ला लग्न समारंभात व्यस्त ठेवत आहेत आधी जयपूरमध्ये आणि आता मुंबईत.” तिसरा नेटकरी म्हणाला, “भाईने लग्नात जाऊन पैसे कमवायला सुरुवात केली आहे. भावोजींनी अंतिम संस्कार केलं.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “पैसे फेका आणि यांचा डान्स बघा.” दरम्यान, लवकरच सलमान ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan trolled for attending wedding fans linked him with katrina kaif dcp