बॉलीवूडचा सुल्तान सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण रायसन बिहाल येथे सुरु आहे. शुक्रवारी चित्रपटातील तीन दृश्यांचे येथे चित्रीकरण करण्यात आले. पहिल्या दृश्यात सैनिकांची गाडी जखमी जवानांना घेऊन आर्मी रुग्णालय रायसन बिहाल येथे पोहचताच तेथे खळबळ माजलेली दिसते. जखमी जवानांना गाडीतून उतरवून रुग्णालयात नेताच दिग्दर्शकाने सदर दृश्यास लगेच ओके दिला. तर दुस-या दृश्यात सलमान त्याच्या गाडीने आर्मी रुग्णालयात पोहचतो आणि जखमी जवानांची विचारपूस करतो. त्यानंतर जखमी जवानांना योग्य ते उपचार देण्याचे आदेशही तो देतो.
तिस-या दृश्यात शहीद आणि जखमी झालेल्या जवानांना पाहून सलमान चिंतीत होतो. आपल्या जवानांची परिस्थिती पाहून चिंतीत झालेला सलमान आत-बाहेर फे-या घालू लागतो.. यानंतर दिग्दर्शकाचा लगेचच ओके मिळाल्यानंतर पॅकअप करण्यात आले. गेल्या तीन आठवड्यांपासून ‘ट्यूबलाइट’ चे चित्रीकरण सुरु आहे. खरं तर रोहतांगच्या बाजारात चित्रपटाचे चित्रीकरण होणार होते. पण सलमानचा लहान भाऊ सोहेलच्या पायाला इजा झाल्याने आणि खराब हवामानामुळे शुक्रवारी रायसन बिहाल येथे चित्रीकरण करण्यात आले. दरम्यान आता शनिवारपासून मनाली येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. . १९६२ साली भारत आणि चायनामध्ये झालेल्या युद्धावर हा चित्रपट भाष्य करतो.
चित्रीकरणादम्यान सोहेल झाला जखमी
मढी येथे चित्रीकरणादरम्यान सोहेल खानच्या पायाला इजा झाल्याने तो चित्रीकरणात सहभागी होऊ शकला नाही. त्याला बुधवारी मढी येथे काम करताना इजा झाली होती. त्यानंतर मनालीतील रुग्णालयात त्याच्या पायावर उपचारही करण्यात आले.
सलमान जखमी जवानांची मदत करतो तेव्हा..
शहीद आणि जखमी झालेल्या जवानांना पाहून सलमान चिंतीत
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 25-09-2016 at 11:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan tubelight shoot in manali