तब्बल १९ वर्षांनंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सलमान खान एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल असल्याचं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चनची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आणि या दोघांचं नातं चांगलंच गाजलं होतं. ब्रेकअपनंतर दोघांमध्ये कायमचा दुरावा आला आणि पुन्हा त्यांनी एकत्र कधी कामच केलं नाही. आता या सिक्वलच्या निमित्ताने भन्साळींना ही सुपरहिट जोडी पडद्यावर पुन्हा एकत्र आणायची आहे. पण सलमानला मात्र ऐश्वर्या नव्हे तर दुसरीच अभिनेत्री हवी आहे.
ब्रेकअपनंतर सलमान-ऐश्वर्याने एकत्र चित्रपट करणंच काय, तर एकमेकांसमोर येणंही टाळलं होतं. मात्र भन्साळींनी ऐश्वर्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या चित्रपटासाठी भन्साळींनी दीपिका पदुकोणचाही विचार केला होता. तर दुसरीकडे सलमानचा कल कतरिना कैफला घेण्याकडे आहे. ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर कतरिनासोबत पुन्हा एकदा काम करण्यास सलमान उत्सुक आहे.
वाचा : बॉबी डार्लिंग घटस्फोटासाठी कोर्टात, पती म्हणतो लग्नच बेकायदेशीर
‘हम दिल दे चुके सनम’च्या सिक्वलमध्ये आता सलमानसोबत कोणती अभिनेत्री झळकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. वादविवाद विसरुन ऐश्वर्या जर सलमानसोबत पुन्हा एकदा काम करण्यात तयार झाली, तर हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत राहील हे नक्की.