बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला त्याच्या निर्मितीसंस्थेद्वारे नाविन्यपूर्ण चित्रपट निर्मिण करायचे आहेत. रितेश देशमुखची निर्मिती असलेला मागील अठवड्यात प्रदर्शित झालेला ‘यलो’ हा मराठी चित्रपट हिंदीत निर्माण करण्याची सलमानची इच्छा आहे. रितेश देशमुखने सलमान खानला हा चित्रपट पाहाण्यासाठी आमंत्रित केले होते. ‘यलो’ चित्रपटाचे सह-निर्माता उत्तुंग ठाकूर यांनी सलमान खान ‘यलो’ चित्रपटाची हिंदीत निर्मिती करणार असल्याचे जाहीर करत याचे श्रेय रितेश देशमुखला दिले. ‘यलो’ हा चित्रपट एका गतिमंद मुलीच्या जिवनावर आधारीत आहे, जिला पोहण्याची आवड आहे. मुळ मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक महेश लिमये हाच बॉलिवूडमध्ये बनत असलेल्या रिमेकचेदेखील दिग्दर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. ‘यलो’ हा चित्रपट गौरी गाडगीळ या मुलीच्या जीवनावर आधारित सत्यघटना असून, गौरीने स्वत: या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय मृणाल कुलकर्णी, मनोज जोशी, उपेंन्द्र लिमये यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.
 

Story img Loader