बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. सलमान खानने आतापर्यंत अनेक अॅक्शन, कॉमेडी आणि इमोशनल ड्रामा चित्रपटात काम केले आहे. सलमान खानच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. सलमानने आतापर्यंत अनेक गाण्यांवर जबरदस्त डान्स केला आहे. सलमानला सिनेसृष्टीतील कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात डान्स करणे अजिबात आवडत नव्हते. अनेकदा तो डान्स करण्याचे शूटींग टाळण्याचा प्रयत्न करत असे, असा खुलासा त्याच्यासोबत काम केलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आहे.

सलमान खान कोणत्याही भूमिकेला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने वयाची पन्नाशी ओलांडली असली तरीही अद्याप तो हँडसम हक म्हणूनच ओळखला जातो. सलमानचे जगभरात लाखो चाहते आहेत. सलमान खान हा सध्याचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमधील एक आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ‘कुर्बान’ हा चित्रपट अनेकांच्या आठवणीत आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री आयशा जुल्काने स्क्रीन शेअर केली होती. नुकतंच आयशाने सलमानबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

आयशाने नुकतंच सा रे ग म पा या गाण्याच्या रिअॅलिटी शो ला हजेरी लावली. त्यावेळी तिने सलमान खानबाबत अनेक गौप्यस्फोट केले. यावेळी आयशाने ‘कुर्बान’ चित्रपटातील सलमानसोबत एक किस्सा शेअर केला आहे. यावर आयशा म्हणाली, “मला चांगलंच आठवतंय, हा माझा पहिला चित्रपट होता. मी सलमान खानसोबत शूटिंग करत होते. त्यावेळी चित्रपटात एक डान्स सिक्वेन्स होता. पण सलमान तो सिक्वेन्स करण्यास टाळाटाळ करत होता. आमच्या कोरिओग्राफरने हा संपूर्ण सिक्वेन्स तयार केला होता. पण त्यावेळी सलमान म्हणाली की मी चालताना एंट्री घेतो. तर दुसरीकडे मी डान्सच्या काही स्टेप्स करत होती.”

“या चित्रपटादरम्यान आम्ही एकत्र अनेक लाईव्ह शो केले. पण आता तो इतका चांगला डान्सर झालाय हे बघून मला आश्चर्य वाटते. त्याच्या प्रत्येक स्टेप्स प्रचंड पॉलिश दिसतात. आता तो इतक्या चांगल्या डान्स स्टेप्स करतो हे पाहून मला असं वाटतं की कदाचित याआधी तो नाटक करत असावा,” असेही आयशा म्हणाली.

अक्षय कुमार आणि कॉमेडियन कपिल शर्माचं बिनसलं? ‘बच्चन पांडे’च्या प्रमोशनसाठी दिला स्पष्ट नकार

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणून आयशा जुल्काचे नाव घेतले जाते. आयशा जुल्काने ‘खिलाडी’ आणि ‘जो जीता वही सिंकदर’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जीनियस’ या चित्रपटात शेवटचे काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे.

Story img Loader